मुंबई पोलिसांना सलाम; आईच्या कुशीत चिमुकलीच्या चेहऱ्यावर फुललं हसू

टीम ई सकाळ
Friday, 8 January 2021

मुलगी ताब्यात मिळताच आईला भावना अनावर झाल्या. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी मायलेकींच्या भेटीने पोलिस कर्मचारीही भावूक झाले होते.

मुंबई - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुकवरून एक व्हिडिओ शेअर करून महाराष्ट्र पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं आहे. पोलिस लोकांची सेवा किती तत्परतेनं करतात आणि संबंधितांना झालेला आनंद यामध्ये दिसत आहे. मालवणी इथल्या एक वर्षांच्या चिमुकलीच दोन दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं. याप्रकरणात एकाला 48 तासांच्या आत अटक केली असून चिमुकलीची सुखरूप सुटका कऱण्यात आली आहे. 

मुलगी ताब्यात मिळताच आईला भावना अनावर झाल्या. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी मायलेकींच्या भेटीने पोलिस कर्मचारीही भावूक झाले होते. तसंच एका आईला तिची लेक सुखरूप मिळाल्याचं समाधान आणि आनंद सर्व पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. 

गृहमत्र्यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, मालवणी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी अहोरात्र मेहनत घेऊन अवघ्या ४८ तासांच्या आत अपहरण झालेल्या १ वर्षीय मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुखरूप सुपूर्द केले. तसेच सदर आरोपीला अटकही केली. मालवणी पोलिसांचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malvani police rescued 1 year girl in 48 hours