Mumbai Rape News | अल्पवयीन मुलींवर करायचा बलात्कार; मुंबईतल्या नराधमाचं बिंग फुटलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अल्पवयीन मुलींवर करायचा बलात्कार; मुंबईतल्या नराधमाचं बिंग फुटलं!

अल्पवयीन मुलींवर करायचा बलात्कार; मुंबईतल्या नराधमाचं बिंग फुटलं!

चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने एकाने दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडली आहे. पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या एका वर्षापासून आरोपी १३ वर्षीय दोन्ही मुलींना वसई भागातल्या एका जंगलात घेऊन जायचा आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार करायचा, अशी माहिती मिरा भाईंदर- वसई विरार पोलीस नियंत्रण कक्षाने दिली आहे.

हेही वाचा: 16 वर्षीय मुलीवर बलात्कार; अश्लील फोटो केले व्हायरल

या माणसाने या मुलींकडे ७० हजार रुपयेही मागितले होते. जर पैसे दिले नाहीत, तर तुमचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकेन अशी धमकीही त्याने या मुलींना दिली. या मुलीच्या पालकांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

या तक्रारीनुसार या आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३७७(अनैसर्गिक संभोग), ३८४(खंडणी) आणि ५०६ (धमकी) या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Man Alleged Raped 13 Years Old Girls In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top