कोरोनामुळे ८१ वर्षीय बिल्डरचा झाला मृत्यू, शफिकने चालवली शैतानी खोपडी आणि आखला एक प्लॅन...

सुमित बागुल
Tuesday, 28 July 2020

काही लोकांची संवेदना एवढी मेलीये की अशी माणसं मेलेल्या माणसालाही सोडत नाहीत.

मुंबई : काही लोकांची संवेदना एवढी मेलीये की अशी माणसं मेलेल्या माणसालाही सोडत नाहीत. मुंबईतील कांदिवलीत एक भीषण प्रकार घडलाय. कांदिवली पोलिसांनी एका अशा रॅकेटचा भांडाफोड केलाय जे मृत बिल्डरच्या अकाऊंटमधून रक्कम ट्रान्स्फर करायचा प्रयत्न करत होते. डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस अकबर पठाण यांनी याबाबत माहिती दिली आणि या केसमध्ये चार जणांना अटक करण्यात आलीये. या चार जणांची नावं शफिक शेख, प्रितेश मांडलिया, अर्शद सैयद आणि स्वप्निल ओगेलेकर अशी आहेत. 

हेही वाचा : आता इमारतीच्या बाहेर होणार तुमचं फुफ्फुसांचं स्कॅनिंग, पालिकेनं बसवली यंत्रणा

कसा आखला प्लॅन ? 

पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींपैकी शफिक हा बिल्डरकडे कामाला होता. काही दिवसांपूर्वी ८१ वर्षीय बिल्डरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भामट्या शफिकला बिल्डर कोणती कागदपत्रे कुठे ठेवतात हे चांगलं ठाऊक होतं. शफिकने आपलं शैतानी डोकं चालवलं आणि एक प्लॅन आखला. शफिक बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेला, त्याने बिल्डरचं चेकबुक चोरलं. यामध्ये बिल्डरने काही चेक्सवर आधीच सह्या करून ठेवल्या होत्या. त्यांनी ऑफिसमधून बिल्डरचं आधार कार्ड देखील चोरलं आणि त्याची झेरॉक्स काढून त्यावर आपल्या एका मित्राचा फोटो चिकटवला. नव्या फोटोने त्याने पुन्हा त्याने आधार कार्डची झेरॉक्स काढली. हे खोटं आधारकार्ड घेऊन त्याने बिल्डरच्या नावावर एक सिमकार्ड खरेदी केलं. बिल्डरच्या अकाऊंटमधून पैसे काढताना OTP प्राप्त करून घेण्यासाठी त्याने हा सारा प्रकार केलेला. 

हेही वाचा : लॉकडाऊन काळातही अवैध दारुचा महापूर; तब्बल 'इतक्या' कोटीची दारु जप्त...

पोलिसांच्या तावडीतून कुणीही सुटत नाही...

मात्र शफिक आपल्या इराद्यांमध्ये सफल होऊ शकला नाही. त्याला आणि त्याच्या साथीदारांना कांदिवली क्राईम ब्रांच पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. कांदिवली क्राईम ब्रांचचे सिनिअर इन्स्पेक्टर चिमाजी आढाव आणि शरद झिने यांच्या टीमने या भामट्या चौघांना अटक केलीये. या चौघांना मुंबईच्या कोर्टाने ३१ जुलैपर्यंत क्राईम ब्रांचच्या कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

man and his friends tried to withdraw money from demised 81 year builder


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man and his friends tried to withdraw money from demised 81 year builder