esakal | फसवणूकीचे 71 लाख कसिनोमध्ये जुगारात उडवले, आरोपी अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूकीचे 71 लाख कसिनोमध्ये जुगारात उडवले, आरोपी अटकेत

सौरभ गांधी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून गुंतवणूकीतून अधिकचा परतावा देण्याच्या नावाखाली आरोपीने जगन्नाथ गोविंद राजू यांची फसवणूक केली.

फसवणूकीचे 71 लाख कसिनोमध्ये जुगारात उडवले, आरोपी अटकेत

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई, ता. 05 : खासगी कंपनीत सल्लागार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची 71 लाख रुपयांची फसवूक करणाऱ्या आरोपीला पंतनगर पोलिसांनी गुरूग्राम येथून अटक केली आहे. आरोपीने फसवणूकीचे पैसे कसिनोमध्ये जुगार खेळून उडवले असल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले आहे. आणखी काही व्यक्तींचीही आरोपीने फसवणूक केली आहे अशी माहिती समोर येतेय. 

सौरभ गांधी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून गुंतवणूकीतून अधिकचा परतावा देण्याच्या नावाखाली आरोपीने जगन्नाथ गोविंद राजू यांची फसवणूक केली. अधिक परताव्याचे आमीष दाखवल्यामुळे राजू यांनी आरोपीला त्यांच्या क्रेडीटकार्डची माहिती दिली. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या इलेक्ट्रॉनिक वॉलेटमध्ये सव्वा तीन कोटी रुपये हस्तांतरीत केले. त्यानंतर वेळोवेळी ही रक्कम काढण्यात आली. गांधीने त्यातील दोन कोटी 44 लाख रुपये परत केले. पण त्याने उर्वरीत रक्कम परत केली नाही.

महत्त्वाची बातमी : कलाकारांना ड्रग्स पुरवणाऱ्या सुल्तान मिर्झाला NCB कडून अटक, मुंबईत धडक कारवाई

त्यानंतर राजू यांनी या प्रकरणी घाटकोपर येथील पंतनगर पोलिसांकडे तक्रार केली. आरोपी एका बड्या विमा कंपनीसाठी काम करत होता. 2018 मध्ये त्याने सौरभने राजू यांना दूरध्वनी करून गुंतवणूकीवर अधिक परतावा देण्याचे आमीष दाखवले. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडे गांधीने बँक व क्रेडिट कार्डची माहिती मागितली.

अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो: आदित्य ठाकरे

सुरवातीला राजू यांनी कोणतीही माहिती दिली नाही. मात्र काही कालावधीनंतर आरोपीशी चांगली ओळख झाल्यानंतर त्यांनी क्रेडिटकार्डची माहिती त्याला दिली. त्याने आतापर्यंत 71 लाख रुपयांची रक्कम दिली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन वर्ष शोध घेतल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. सहा नोव्हेंबरपर्यंत आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने फसवणूकीतील रक्कम कसिनोमध्ये खेळलेल्या जुगारात उडवली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोपीकडून फसवणूकीतील रक्कम हस्तगत करता आलेली नाही.

आरोपीने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.

man in mumbai dupped for seventy one lacs after sharing credit card details

loading image
go to top