मुख्यमंत्र्यांकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो: आदित्य ठाकरे

पूजा विचारे
Thursday, 5 November 2020

आदित्य ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून काय शिकलो हे सांगितलं आहे. गेल्या एका वर्षात शिकण्यासारखं खूप होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

मुंबईः कुलाबा वांद्रे सिप्झ या मेट्रो 3 चे कारशेड आरेऐवजी कांजुरमार्ग येथील भूखंडावर बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या भूखंडावर केंद्राने दावा केला आहे. ही जमीन MMRDA ला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याबाबतची सूचना केंद्राने राज्य सरकारकडे केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकांमुळे मेट्रो 6 आणि मेट्रो 3 प्रकल्पांच्या कारशेडच्या कामाला रेड सिग्नल लागला आहे. मात्र कांजुरमार्गची जागा ही महाराष्ट्राच्या मालकीची आहे. त्यासाठी केंद्राच्या परवानगीची काहीही गरज नसल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला ठणकावलं आहे. 

याबाबत आदित्य ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून काय शिकलो हे सांगितलं आहे. गेल्या एका वर्षात शिकण्यासारखं खूप होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

अधिक वाचाः  लॉकडाऊन दरम्यान रेल्वेची चमकदार कामगिरी, तब्बल 19 नवीन FOBची उभारणी

आरे कारशेडच्या स्थगितीनंतर नव्या कारशेडच्या जागेवरुन विरोधक राजकारण करत आहेत. कारशेड कांजुरमार्गला हलवल्यानं मुंबईकरांना त्याचा फायदा होणार आहे. आरे कारशेडमुळे मिठी नदीच्या प्रवाहाला धोका होता असंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. 

मी जे काम करेन हेच विरोधकांसाठी उत्तर असेल. म्हणून विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यात मी जास्त वेळ खर्च करत नाही. लोकांची सेवा करणं यांच्याकडे आम्ही राजकारण म्हणून बघतो. सध्याच्या दिवसात एवढं काम आहे की, या कामाच्या व्यापात कोणी काही बोललं तरी कोणाचीही चिड येत नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत. तसंच लोकांचा विश्वास महाविकास आघाडी सरकारवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी आम्ही सुख- समृद्धीचे दिवस आणू, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. 

अधिक वाचाः  बेस्टला केलेल्या मदतीचा हिशोब घेऊन पुढील मदत करणार: मुंबई पालिका

I learned from Chief Minister how exercise restraint Minister of Environment Aditya Thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I learned from Chief Minister how exercise restraint Minister of Environment Aditya Thackeray