फुटपाथवर झोपलेला 'तो' तरुण कोविड हॉस्पिटलमधून पळाला होतो, पुन्हा दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

सुमित बागुल
Friday, 10 July 2020

मुंबईनजीकच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई,  मीरा-भाईंदर या मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमालीची वाढतेय.

मुंबई - मुंबईनजीकच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई,  मीरा-भाईंदर या मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमालीची वाढतेय. याच पार्श्वभूमीवर या सर्व भागांमध्ये कडकडीत लॉकडाऊन पाळला जातोय. पण याच शहरांमधून काही धक्कादायक बातम्या समोर येतायत. आधी मुंब्रा इथून एक कोविड पॉझिटिव्ह महिला पळून गेलेली. असाच एक धक्कादायक प्रकार आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत घडलाय. मुंब्रा भागातील महिलेला पुन्हा कोरोना सेंटरमध्ये आण्यात यश आलं होतं, मात्र कल्याण डोंबिवलीत जे झालंय ते अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे.  
 
कल्याण डोंबिवली महापालिकेतील हद्दीत डोंबिवली पश्चिम भागातील शास्त्रीनगर भागात एक कोरोना रुग्ण फुटपाथवर झोपलेला आढळून आला. तिथल्या काही स्थानिकांनी त्याचा व्हिडीओ देखील केला. या रुग्णाला स्थानिकांनी त्याचं नाव आणि कुठून आलास हे विचारण्याचा प्रयन्त देखील केला. मात्र सदर व्यक्तीला काहीही बोलता येत नव्हतं. घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिकांनी त्या व्यक्तीबाबतची माहिती रुग्णालयाला फोनवरून दिली. काही काळानंतर या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र सदर व्यक्ती मृत असल्याचं रुग्णालयाने घोषित केलं. 

BIG NEWS - 'केडीएमटी' समिती सभापतींच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा; सचिव कार्यालयात हालचाली सुरू....

धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मृत व्यक्ती हा कोरोना रुग्णालयातून गुरुवारी रात्री पळून गेला होता. हा व्यक्ती पळून कुठे गेला याबाबत शोध घेणं सुरु होतं, मात्र त्याबाबत माहिती मिळू शकली नव्हती. स्थानिकांनी केलेल्या व्हिडीओमुळे या व्यक्तीबाबत माहिती समोर आली. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.       

गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली महापालिकाहद्दीत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येतायत. गेल्या चोवीस तासात या महापालिका हद्दीत तब्ब्ल ५८० नवीन रुग्ण आढळून आलेत. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने कल्याण डोंबिवलीमधील कोरोना सेंटर्स खच्चून भरल्याचं चित्र आहे. शास्त्रीनगर भागात या आधीही कोरोना रुग्ण पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. 

man ran from covid hospital slept on footpath passed away


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man ran from covid hospital slept on footpath passed away