महाभयंकर ! इटली नाही हे आहे ठाणे, कोरोनाग्रस्त रस्त्यावरच तडफडत होता, अँब्युलन्स आली तोवर 

महाभयंकर ! इटली नाही हे आहे ठाणे, कोरोनाग्रस्त रस्त्यावरच तडफडत होता, अँब्युलन्स आली तोवर 

ठाणे - कोरोनाच्या धसक्यामूळे वागळे इस्टेट येथील रुग्णाला भर रस्त्यातच मृत्यूला कवटाळलंय आहे. या रुग्णासाठी रुग्णवाहिका मागविण्यात आली होती. पण या साध्या अँब्युलन्समध्ये बसविण्यासाठी अँब्युलन्स  चालकाकडे पीपीई किट नसल्याने तो या रुग्णाला हात लावण्यास घाबरत होता. तीच स्थिती तेथे उपस्थित सुमारे शंभर लोकांची होती. अखेर शेकडो लोकांच्या डोळ्यादेखत या कोरोना बाधित ज्येष्ठ नागरिकाने रस्त्यावरच अखेरचा श्वास घेतला. काळीज पिळवटून टाकणाऱया या घटनेनंतर उपस्थितीच्या हाती हळहळ व्यक्त करण्याशिवाय काहीही नव्हते.

वागळे इस्टेट भागातील शिवाजी नगर भागात एका 60 वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा रस्त्यावर तडफडून मृत्यु झाला आहे. या रुग्णाला घेण्यासाठी तेथे अँब्युलन्सही त्याला घेण्यासाठी आली होती. मात्र या अँब्युलन्स सोबत डॉक्टर अथवा इतर स्टॉफ नव्हता. तसेच या अँब्युलन्स चालकाकडे पीपीई कीट नव्हते. त्यामूळे या अॅब्युलेन्समध्ये संबधित रुग्णाला बसविण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला घेतला नाही. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तब्बल दोन तास त्याची रस्त्यावर उपचारासाठी परवड सुरु होती. अखेर कोणीही अँब्युलन्स मध्ये बसविण्यासाठी पुढाकार न घेतल्याने या रुग्णाचा तेथेच तडफडून मृत्यु झाला. वागळे इस्टेट भागातील शिवाजी नगर भागात लोक किती अंसंवेदनशील झाली आहेत याचा परीपाठ मिळतानाच कोरनाची दहशत किती पसरली आहे याचाही धडा मिळाला आहे.

शिवाजी नगर येथे राहणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे त्याची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी या रुग्णाला जास्तीचा त्रस होऊ लागल्याने त्याच्या मुलीने त्यांना कळवा रुग्णालयात नेले. मात्र जागा नसल्याचे सांगतानाच तापाचा रुग्ण दाखल करुन घेत नसल्याचे कारण या मुलाला देण्यात आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांनी धाव घेतली. पण तेथेही जोपर्यंत रुग्ण पाॅझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट येत नाही तोपर्यत दाखल करुन घेतले जात नसल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आधी रिपोर्ट आणा मगच दाखल करुन घेतो असे त्यांना सांगण्यात आले. अखेर त्या मुलीने आपल्या पित्याला पुन्हा घरी नेले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्याला जास्तीचा त्रस होऊ लागला. त्यानंतर त्या मुलीने तेथील माजी स्थानिक नगरसेवकाला सांगून अँब्युलन्स  मागविली. अँब्युलन्सदेखील चारच्या सुमारास त्या परिसरात दाखल झाली. मात्र त्याच दरम्यान रुग्णाचा रिपोर्टही आला होता, त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

अँब्युलन्स घेऊन येणारा चालकासोबत पीपीई किट घातलेला कोणीही नसल्याने या रुग्णला गाडीत बसवून नेणार कोण हा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान परिसरातील सुमारे 100 नागरीक त्या रुग्णाची रस्त्यावर होणारी तडफड पाहत होते. पण हा रुग्णाचा अहवाल हा पॉझीटीव्ह आल्याने कोणीही पुढे जाण्यास तयार होत नव्हता. बघ्यांची गर्दी केवळ त्याची तडफड पाहत होते. तो तडफडत होता, त्याला खुप त्रस होत होता. परंतु पीपीई किट नसल्याने कोणीही पुढे जाण्यास धजावत नव्हता. यात दोन तासांचा कालावधी निघून गेला आणि तडफडून त्या व्यक्तीचा तेथेच मृत्यु झाला. यावेळी या रुग्णाच्या मुलीने फोडलेल्या हंबरडयाने उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. पण कोरोनाच्या भीतीपुढे यापैकी कोणीही शेवटपर्यंत पुढे येण्यास धजावला नाही.

man in thane lost his life because ambulance driver didnt have PPE kit and support staff

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com