हॉस्पिटलने दिलं एक लाख तीस हजारांचे बिल, बिल पाहून रुग्णाने हॉस्पिटलमधून ठोकली धूम..

सुमित बागुल
Monday, 27 July 2020

एकतर कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांची पगार कपात झालीये. अशात कोरोना हॉस्पिटल्सकडून कोरोना रुग्णांची मात्र लुटालूट होतेय.

मुंबई : एकतर कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांची पगार कपात झालीये. अशात कोरोना हॉस्पिटल्सकडून कोरोना रुग्णांची मात्र लुटालूट होतेय. सर्वसामान्य नागरिकांना खासगी कोविड रुग्णालयाची बिलं परवडेनाशी आहेत. जादा बिलं आकारल्यामुळे काही रुग्णालयाचे लायसन्सेस रद्द झालेत, तर काहींवर कारवाई झालीये. अशात विरारमध्ये अशीच एक घटना घडली आहे अशी माहिती आहे. अवाच्यासव्वा बिल आल्याने रुग्णालयातील एक कोरोना रुग्ण चक्क रुग्णालयातून पळून गेल्याचं समजतंय.

मोठी बातमी मुख्यमंत्र्यांच्या स्टिअरींच्या विधानांनंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांकडून सूचक फोटो ट्विट

मिलेल्या माहितीप्रमाणे विरामधील वल्लभ रुग्णालयात हा प्रकार घडलाय. एका कोरोना रुग्णाला हॉस्पिटलने तब्बल एक लाख तीस हजारांचा बिल सोपवलं. रुग्णाने त्यातील पन्नास हजार रुपये भरले देखील. मात्र रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला डिशचार्ज देण्याआधीच त्याने थेट रुग्णालयातून काढता पाय घेतला. याबाबत अर्नाळ्याच्या पोलिस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही असं पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश शेट्टे म्हणालेत. सदर घटना ही आठवडाभरापूर्वीची आहे.  

मोठी बातमी  - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवशीच उद्धव ठाकरेंना ठाकरेंना टोला, म्हणालेत पंतप्रधान... 

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटनेनंतर रुग्णालयाकडून 'त्या' पळून गेलेल्या रुग्णाला फोनही करण्यात आलेला. मात्र, या रुग्णाने हॉस्पिटल स्टाफला उलटसुलट उत्तर दिल्याचं बोललं जातंय. याबाबतची कथित ऑडिओ क्लिपही त्या परिसरात चांगलीच व्हायरल होतेय. दरम्यान, याबाबत बोलण्यास हॉस्पिटलमधील कुणीही समोर येत नाहीये. 

man from virar alleged to be ran from vallabh hospital after seeing huge bill


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man from virar alleged to be ran from vallabh hospital after seeing huge bill