मुख्यमंत्र्यांच्या स्टिअरींच्या विधानांनंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांकडून सूचक फोटो ट्विट

मुख्यमंत्र्यांच्या स्टिअरींच्या विधानांनंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांकडून सूचक फोटो ट्विट

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीची धुरा सांभाळणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा, उद्धव ठाकरेंचा आज ६०वा वाढदिवस. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यालय किंवा ‘मातोश्री’ निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या, असेही आवाहन त्यांनी केले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा मी कोरोनायोद्ध्यांना समर्पित करत असल्याची  भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना वाढदीवशी शुभेच्छा दिल्यात. या शुभेच्छांची सध्या जोरदार चर्चा आहे. 

अजित पवारांच्या ट्विटची चर्चा : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवरून उद्धव  ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात. यामध्ये अजित पवारांनी एक फोटो ट्विट केलाय. या फोटोत अजित पवार आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीत बसलेला पाहायला मिळतायत. पण या गाडीचं स्टिअरिंग व्हील मात्र अजित पवारांच्या हातात आज. त्यामुळे अजित पवारांनी शेअर केलेल्या 'या' फोटोमुळे आता स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात हा प्रश्न मात्र आत विचारला जातोय.

‘मातोश्री’ निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करू नये 

यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यालय किंवा ‘मातोश्री’ निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.  वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या, असेही आवाहन त्यांनी केले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा मी कोरोनायोद्ध्यांना समर्पित करत असल्याची  भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात फलकही लावू नयेत

कोरोनाच्या संकटात वाढदिवस साजरा न करण्याबरोबरच कुठेही गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मागील चार महिन्यांत शिवसैनिकांनी कोरोना योद्ध्यांसोबत कोरोनाविरोधी युद्धात झोकून दिले आहे. कुठे ऍम्ब्युलन्स पोहोचवत, कुठे प्रत्यक्ष रुग्णालयात जात तर कुठे रक्तदान शिबिरे, प्लाझ्मादानच्या माध्यमातून ही समाजसेवा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हेच समाजसेवेचे व्रत वाढदिवसानिमित्तही सुरू ठेवण्याचे आवाहन केले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करू नये त्याचप्रमाणे जाहिरात फलकही लावू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. कोरोनाचा धोका टळलेला नाही. तेव्हा सावध राहून नियमांचे पालन करावे. या दिवशी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जनआरोग्य शिबिरे घ्यावीत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

dcm ajit pawar wishes cm uddhav thackeray on his birthday in unique way

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com