esakal | योगी आदित्यनाथ यांना आलेली जीवे मारण्याची धमकी आणि त्याचं मुंबई कनेक्शन, मुंबईतून झाली अटक...

बोलून बातमी शोधा

योगी आदित्यनाथ यांना आलेली जीवे मारण्याची धमकी आणि त्याचं मुंबई कनेक्शन, मुंबईतून झाली अटक...

ATS ची कारवाई, मुंबईतून तरूणाला अटक.. 

योगी आदित्यनाथ यांना आलेली जीवे मारण्याची धमकी आणि त्याचं मुंबई कनेक्शन, मुंबईतून झाली अटक...
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच ATS ने मुंबईतून ताब्यात घेतलंय. या इसमाविरोधात उत्तर प्रदेशातील गोमतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

कामरान आमीन खान असं या आरोपीचं नाव आहे. त्याच वय 25 वर्ष इतकं आहे. शुक्रवार दिनांक २२ मे २०२० रोजी  लखनऊ पोलिस मुख्यालयातील सोशल मीडिया हेल्प डेस्कवर निनावी संदेश आला होता. संदेश करणा-या व्यक्तीविरोधात गोमती नगर पोलिस ठाण्यात अंतर्गत धमकी देणे व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोठी बातमी - मृत रुग्णाच्या शरीरातील कोरोनाचं होतं काय ? कोरोना शरीरात फोफावतो की मरतो?

याबाबतची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती घेतली आणि शोधास सुरवात केली. त्यावेळी आरोपी चुनाभट्टी येथील म्हाडा कॉलनीतील असल्याची माहिती पोलिसांच्या एटीएस विभागाला मिळाली. अखेर त्याला शनिवारी म्हणजेच सिंक २३ मे २०२० रोजी ताब्यात घेण्यात आलं आहे. 

चौकशीत त्याने दूरध्वनी केल्याचे मान्य केल्यानंतर त्याला उत्तर प्रदेश एसटीएसफच्या ताब्यात देण्यात आले. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून ट्रान्झीट रिमांडची मागणी करण्यात येणार आहे.

man who gave bomb threat to yogi aadityanath arrested from mumbai