मृत रुग्णाच्या शरीरातील कोरोनाचं होतं काय ? कोरोना शरीरात फोफावतो की मरतो?

मृत रुग्णाच्या शरीरातील कोरोनाचं होतं काय ? कोरोना शरीरात फोफावतो की मरतो?

मुंबई : मृत व्यक्तीवर कोरोना विषाणूंच्या होणाऱ्या परिणामाचा अभ्यास एम्स मधील डॉक्टर करणार आहेत. त्यासाठी ते कोरोना संसर्गाने दगावलेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन करणार आहेत.        

रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरातील कोरोना विषाणू किती वेळ जिवंत राहतो , त्याच्यापासून इतरांना संसर्ग होतो का याचा अभ्यास केला जाणार आहे. दिल्ली रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्तता यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना विषाणूंचा मानवी शरीरावर नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी यामुळे मदत मिळणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. यासाठी मृतकांच्या नातेवाईकांची परवानगी घेण्यात येणार आहे. या अभ्यासात रोग विज्ञान आणि आणि अणू जीव विभाग देखील सहभागी होणार आहेत.

देशात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. त्यामुळे विचारपूर्व ही योजना आखली जात आहे. कोरोना विषाणूंंचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो हे या अभ्यासामुळे समजण्यास मदत मिळणार आहे.  शिवाय कोरोना विषाणू शरीरात गेल्यानंतर त्याचा  नेमका परिणाम काय होतो हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तसेच कोरोना बाधित रुग्ण दगावल्यानंतर विषाणूंचे नेमके काय होते याचा देखील अभ्यास केला जाणार आहे. रुग्ण दगावल्यानंतर विषाणूचे पुढे काय होते, तो किती काळ शरीरात राहतो , रुग्ण मृत झाल्याने विषाणूवर काही परिणाम होती का , मृत रुग्णाच्या शरीरातील विषाणू किती काळाने नष्ट होतो या प्रशांची उकल अद्याप झालेली नाही. याचीच उकल करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की रुग्ण दगावल्यानंतर कोरोना  विषाणू हळू हळू नष्ट होतो. मात्र एखाद्या रुग्णांचे शव किती वेळाने संक्रमण मुक्त होते याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या शवाचे शवविच्छेदन चिरफाड न करता करण्याचा सल्ला त्यांच्याकडून दिला जातो. कोरोना संसर्गामुळे दगावणाऱ्या रुग्णांचे शवविच्छेदन चिरफाड न करता करणे महत्वाचे आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेहांची चिरफाड केल्यास लॅब मधील किंवा कामासाठी जुंपलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील कोरोना संसर्गाची बाधा होण्याची भीती असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना बाधित मृतदेहांची शवविच्छेदन करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची एक विशेष टीम बनवण्यात आली आहे. या सर्व तज्ञ डॉक्टरांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक तज्ञ डॉक्टरांचे पथक मृतदेहांवर प्रयोग करून निरीक्षणे नोंदवणार आहेत. सध्या प्रयोगाची तयारी ही प्राथमिक स्तरावर असून प्रत्यक्ष प्रायोगाला काही दिवसांनी सुरुवात होऊल. हे प्रयोग यशस्वी झाल्यास कोरोना संसर्गाबाबत महत्वाची माहिती समोर येणार असल्याने संसर्गाच्या वेळी घ्यायची काळजी आणि औषोधोपचार करण्यास मदत मिळणार आहे.

what happen to corona once person lose his life ICMR to conduct report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com