esakal | हृदयद्रावक ! कसाबला फाशीच्या दारात पोहोचवणारा 'तो' सध्या काय करतोय?  
sakal

बोलून बातमी शोधा

हृदयद्रावक ! कसाबला फाशीच्या दारात पोहोचवणारा 'तो' सध्या काय करतोय?  

काही वर्षापूर्वी जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता.  दहशतवादी अजमल कसाबला फाशी देताना ते मुख्य साक्षीदारांपैकी एक होते

हृदयद्रावक ! कसाबला फाशीच्या दारात पोहोचवणारा 'तो' सध्या काय करतोय?  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबईः 26/11 ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख झाल्यावर अंगावर काटा उभा राहतो. सीएसटी स्टेशनवर बेछुट गोळीबार करणारा दहशतवादी कसाबला जिवंत पकडण्यात यश आलं होतं. त्यातच आता कसाबचा फाशीच्या दारापर्यंत पोहोचवणाऱ्या हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. कारण त्यांचा सांभाळ करण्यास कोणीही तयार नसल्याचं समोर आलं आहे.

काही वर्षापूर्वी जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता.  दहशतवादी अजमल कसाबला फाशी देताना ते मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. कसाबला फाशी दिल्यानंतर त्यांचा एक हिरो म्हणून सन्मान देखील करण्यात येणार होता. या दहशतवादी हल्ल्यात कसाबच्या बंदूकीतून त्यांना एक गोळी देखील लागली होती. मात्र इतक्या वर्षांनी त्यांच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. श्रीवर्धनकर हे एक माजी सरकारी कर्मचारी आहेत.

खरंच नियमित पान खाल्ल्याने 'ती'  पावर वाढते का ?

60 वर्षांचे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर मुंबईच्या एका फुटपाथवर झोपले होते. एका दुकानदाराचं त्यांच्यावर लक्ष गेलं. दुकानदारानं त्यांची मदत केली. त्यानंतर समजलं की, हे कोणी सामान्य व्यक्ती नसून त्यांनी 26/11 च्या दहशतवादी कसाबची कोर्टात ओळख पटवून साक्ष दिली होती. तसंच हल्ल्यात कसाबनं मारलेली गोळी लागून बचावले. कामा हॉस्पिटलच्या बाहेर कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माइलनं ओपन फायरिंग केली होती. त्यावेळी हरिश्चंद्र जखमी झाले होते.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, हरिश्चंद्र यांना  Dean D’Souza  नावाच्या व्यक्तीनं महालक्ष्मी जवळ असलेल्या सातरस्ता येथे फुटपाथवर झोपलेलं पाहिलं. त्यावेळी त्यांची परिस्थिती खूप वाईट होती. डिसुजा हे एका दुकानाचं मालक आहेत. या वयोवृद्ध व्यक्तिला मदत करण्याचं त्यांनी ठरवलं. डिसुझा यांचे मित्र गायकवाड IMCares नावाची एक एनजीओ चालवतात. या एनजीओनं त्यांना खायला दिलं पण त्यांनी खाल्लं नाही. त्यानंतर श्रीवर्धनकर यांना अंघोळ घालून त्यांचे केस कापले. यादरम्यान श्रीवर्धनकर सारखे दोन शब्द बोलते होते, ते म्हणजे BMC आणि महालक्ष्मी. त्यावरुन एनजीओला काही संकेत मिळाले ज्यानंतर त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.

तुमचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाय, कपडे आणि इतर साहित्य बांधून ठेवा, ऍम्ब्युलन्स तुम्हाला न्यायला येतेय

गायकवाड यांनी हरिश्चंद्र यांच्या भावाचा पत्ता शोधून काढला आणि हरिश्चंद्र यांचा संबंध 26/11 ला झालेल्या हल्ल्याशी असल्याचं समोर आलं. गायकवाड यांनी सांगितलं की, आम्ही पूर्ण दिवस बीएमसी कॉलोनीजवळ घालवला आणि त्यांच्या भावाचा शोध घेतला. त्यांनी आम्हाला श्रीवर्धनकर यांच्याबद्दल सांगितलं. श्रीवर्धनकर हे कल्याणला राहतात. त्यांच्या भावानं आम्हाला 26/11 हल्ल्याशी संबंधित सर्व इतिहास देखील आम्हाला सांगितला. पुढे गायकवाड म्हणाले की, या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही पोलिसांची ही मदत घेतली.

अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे हरिश्चंद्र यांच्या कुटुंबियांना त्यांचा सांभाळ करायचा नाही आहे. कुटुंबियांतल्या लोकांना त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचे आहे. कुटुंबियातल्या सदस्यांनी सांगितलं की, डोक्याला गोळी लागल्यानंतर त्यांना बोलताना त्रास होतो. त्यांना नीट बोलता येते नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत राहताना त्रास उद्धभवत आहे, असं गायकवाड यांनी सांगितलं.

गायकवाड पुढे म्हणतात की, लोकांनी पुढे येऊन या व्यक्तीस मदत करावी अशी आमची इच्छा आहे. त्यांनी एका दहशतवाद्याला शिक्षा देण्यासाठी मदत केली. डोक्याला जखम झाल्यानं त्यांना बोलताना समस्या निर्माण होत आहे. दुर्दैव आहे की या व्यक्तीला या परिस्थितीतून जावं लागत आहे.

man whose role in identifying 2611 mumbai terror attack kasab is staying on road

loading image
go to top