तुमचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाय, कपडे आणि इतर साहित्य बांधून ठेवा, ऍम्ब्युलन्स तुम्हाला न्यायला येतेय

विष्णू सोनवणे 
Tuesday, 5 May 2020

प्रत्येक दिवस मृत्यू जगत होतो, ठाण्याच्या उपनिरीक्षकाने सांगितला अनुभव...

मुंबई - कोरोनाचा तुमचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. कपडे आणि इतर साहित्य बांधून ठेवा, ऍम्ब्युलन्स तुम्हाला न्यायला येत आहे. फोनवरील हे संभाषण ऐकताच माझ्या पायाखालची वाळूचा सरकली. आता आपण काही जगत नाही, या भीतीने मी हादरून गेलो. मला काहीच सुचत नव्हते. कोणाशी काय बोलावे समजत नव्हते. त्या क्षणापासून मी मृत्यू जगत होतो. कोरोनाचा हा जीवघेणा थरार अनुभवला आहे मुंबईतील एका पोलिस उपनिरीक्षकाने.

डोंगरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अविनाश हरडक कोरोना बाधित झाल्यानंतरचा त्यांनी अनुभवलेला थरारक अनुभव ते सांगत होते. ते म्हणाले, मी गावी गेलो तेव्हा लॉकडाऊनची घोषणा झाली. आता मुंबईला जाऊ नका असे घरचे सर्वजण सांगत होते. मुंबईला जाण्यासाठी साधन नव्हते, अशा प्रसंगी ड्युटीवर हजर राहणे माझे कर्तव्य होते. घरच्यांचा विरोध डावलून मी मुंबईला यायला निघालो. दुसऱ्या दिवशी मी पोलिस ठाण्यात दाखल झालो.

जीवाची फरफट ! परप्रांतीय मजुरांसाठी बसचीही सुविधा, मात्र इतका खर्च काही परवडेना

12 एप्रिल रोजी माझे सहकारी अंमलदार यांना ताप येऊ लागला, त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांची कोरोनाचा चाचणी करण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाचा झाल्याचे आढळून आले. त्यांच्या संपर्कातील आमच्या सगळ्यांची चाचणी करण्यात आली त्यात माझा रिपोर्ट पोझिटीव्ह आला. रिपोर्ट कळल्याबरोबर काय करावे माझे मला कळेना झाले होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगताच आपण बॅग भरा तुम्हाला एमबुलन्स न्यायला येत असल्याचे सांगितले, काही मिनिटात दारात एमबुलन्स आली त्यात बसलो आणि ती गाडी थेट फोर्ट इथल्या ईएनटी रुगणालयात पोचली.

मला काहीच कळत नव्हते. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी वेगळा मार्ग होता. मनावर प्रचंड दडपण होते. रुगणालयात शिरताच मला रडू येत होते. माझा धीर सुटत चालला होता.मला एके ठिकाणी विलगिकरण कक्षात ठेवले. त्या ठिकाणी 28 पेशंट होते, कोणी खोकत होतं, रडत होतं, कोणी व्हेंटिलेटरवर होते. मी आता येथून जिवंत जात नाही, मी नक्कीच मारणार असे मला वाटत होते. काही वेळाने मला अधिकाऱयांचे फोन येऊ लागले. माझ्या सहकार्याचे फोन येऊ लागले, त्यामुळे मला थोडा धीर आला, या काळात मी गावी माझ्या घरच्यांना काहीच सांगितले नव्हते. गावी याबाबत सांगितले असते तर मला जास्त त्रास झाला असता. त्यामुळे मी गावी सांगणे टाळले, आजूबाजूची परिस्थिती नकारात्मक होती, मात्र मी सकारात्मक विचार करीत होतो.

ऑक्झीमिटर आणि थर्मामीटरची खरेदी रखडण्याची शक्यता, कारण आहे...

28 एप्रिल रोजी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता मात्र तोही हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मला साजरा करता आला नाही. मनावर प्रचंड दडपण होते. पोलीस आयुक्त यांच्यासह, माझें वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्यानी दिलासा दिल्यामुळे दडपण थोडे हलके झाले. योग्य आहार, फळे, पिण्यासाठी गरम पाणी आणि सकारात्मक विचार यामुळे मी बरा झालो. सात दिवसात माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. 

कोरोनाचा झाल्यास खचून जावू नये, आहार घ्यावा, विश्रांती घ्यावी, आपल्या जवळच्या लोकांशी बोलावे, त्यातून आत्मविश्वास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, कोरोनाचा बाधित असाल तर तुम्ही लवकर बरे व्हाल असा मला विश्वास वाटतो.

police officer tells his corona story and shares his experience of institutional quarantine 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police officer tells his corona story and shares his experience of institutional quarantine