

Mandovi And Tejas Express Running Late
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवा विलंबाने दररोज लाखो प्रवाशांचा खोळंबा होत आहे. उपनगरी सेवेनंतर लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरचे नियंत्रणही सुटत चालल्याचे दिसत आहे. दोन दिवस मांडवी आणि तेजस एक्स्प्रेस विलंबाने धावल्याने प्रवाशांना स्थानकांवर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. वेळेवर माहिती न मिळाल्याने प्रवाशांचा रोष अधिकच वाढला. बुधवारी तेजस एक्स्प्रेस तब्बल सहा तास, तर गुरुवारी मांडवी एक्स्प्रेस पावणेतीन तास विलंबाने धावली.