मोठी बातमी : मंगेशकर कुटुंबाची फडणवीसांवर नाराजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले..

मोठी बातमी : मंगेशकर कुटुंबाची फडणवीसांवर नाराजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले..

कर्जत  : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती; मात्र तत्कालीन मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री विनोद तावडे त्यांना भेटायलाही आले नाहीत, अशी खंत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी येथील कार्यक्रमात व्यक्त केली. कर्जत येथील रॉयल गार्डन येथे खुल्या मैदानावर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा कार्यक्रम झाला; त्या वेळी ते बोलत होते.

‘‘कार्यक्रम हवा असल्यास नेतेमंडळी अनेकदा भेटतात, फोन करतात; मात्र दीदी आजारी होती त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री तावडे भेटायलाही आले नाहीत’’ अशी नाराजी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी लतादीदी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले. मंगेशकर कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी जवळचे स्नेहसंबंध आहेत, असंही पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणालेत. 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सहवासात मी २२ वर्षे होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे सावरकरांचे प्रेरणास्थान होते. या स्वातंत्र्यवीरांवर काँग्रेसकडून टीका होत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी बोलून दाखवली. ३० ते ३५ वर्षांपूर्वी मी कर्जत तालुक्‍यातील वैजनाथ येथे आलो होतो. आता एवढ्या वर्षांनंतर प्रसाद कारूळकर यांच्यामुळे कर्जतमध्ये येण्याचा योग आला. यानंतर पुन्हा येणे होईल की नाही हे सांगू शकत नाही, अशी भावनाही पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली.

mangeshkar family is unhappy on devendra fadanavis and vinod tawade

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com