esakal | कांदळवनं पुन्हा बहरू लागली! मुंबईसह ठाणे खाडीतील गतवैभव पुन्हा प्राप्त
sakal

बोलून बातमी शोधा

कांदळवनं पुन्हा बहरू लागली! मुंबईसह ठाणे खाडीतील गतवैभव पुन्हा प्राप्त

हायबलिया प्युएरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे खराब झालेली कांदळवन आता पुन्हा बहरू लागलीत. त्यामुळे मुंबईसह ठाणे खाडीतील कंदळवनांचं गतवैभव पुन्हा प्राप्त होतांना दिसू लागले आहे.

कांदळवनं पुन्हा बहरू लागली! मुंबईसह ठाणे खाडीतील गतवैभव पुन्हा प्राप्त

sakal_logo
By
मिलिंद तांबे


मुंबई : हायबलिया प्युएरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे खराब झालेली कांदळवन आता पुन्हा बहरू लागलीत. त्यामुळे मुंबईसह ठाणे खाडीतील कंदळवनांचं गतवैभव पुन्हा प्राप्त होतांना दिसू लागले आहे. या रोगाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने पर्यावरणप्रेमींनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

ठाणे जिल्हा खाडी पट्ट्यातील कांदळवनांवर हायबलिया प्युएरा नावाच्या रोगाने थैमाम घातले होते. कांदळवनांतील तिवरांची झाडे ही त्यांची आवडतं खाद्य, यामुळे कांदळनवातील झाडे पर्णहीन होऊन सुकली होती. ठाणे,नवी मुंबईसह शिवडी,माहीम मधील खाडीत कांदळवनांचा मोठा पट्टा आहे. या अळ्यांनी केवळ ठाणे तसेच नवी मुंबईतील ऐरोली , वाशी पट्ट्यामधील कांदळवनांवर आक्रमण केले होते. त्यामुळे या खाडी किना-यांवरून जातांना या किड्यांच्या आक्रमणाने खराब झालेली कांदळवन पाहून पर्यावरण प्रमींना चिंता व्यक्त केली होती.

हेही वाचा - अजान स्पर्धेच्या आयोजनावरून पांडुरंग सकपाळ यांचा आणखी एक खुलासा

"टिग डिफॉलेएटर" म्हणजेच पतंगाच्या अळीने ठाणे, नवी मुंबईतील खाडीकिना-यावरील कांदळवनांवर हे आक्रमण केले होते. या अळीने कांदळवनांतील झाडांची सर्व पाने खाऊन टाकल्याने  खुरटी झुडपे तेव्हडी अस्तित्वात होती. या अळ्या केवळ कांदळवनांवरच आक्रमण करत असल्याने खाडीमधील इतर वनस्पतींना त्याची काहीही बाधा झाली नव्हती.
पतंगाच्या अळीचा सप्टेंबर ते नोव्हेंबर हा प्रजननाचा काळ असतो. या दरम्यान पतंगाच्या अळ्या केवळ कांदळवनांवरच आसरा घेऊन अंडी घालतात. त्यामुळे तिन महिने या अळ्या कांदळवनांची पाने खाऊन आपले पोषण करत असतात. साधारणता डिसेंबर दरम्यान या अळ्यांचा परतीचा प्रवास सुरू होत असून तो सुरू झाला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील पंधरवड्यात कांदळवन पुर्वी प्रमाणेच टवटवीत दिसू लागतील असे मँग्रोव्ह फाउंडेशनचे प्रमुख सुरेश वरक यांनी सांगितले. 

हेही वाचा - ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदार मिसळचे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर उर्फ मामा (वय 84) यांचे कोरोनाने निधन झाले.

हिवाळ्याच्या ऋतुत या अळ्यांचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. दरवर्षी या अळ्या खाडीतील केवळ कांदळवनांवर येत असतात. या अळ्या जरी कांदळवनांची पाने खात असल्या तरी यामुळे झाडांना कोणताही धोका पोचत नसल्याचे मँग्रोव्ह फाउंडेशनचे प्रमुख सुरेश वरक यांनी सांगितले. अळ्या निघून जाण्याचा काळ आता सुरू झाला आहे. अळ्या निघून जात असल्याने झाडे पुन्हा पुर्वीप्रमाणेच हिरवी गर्द होत असल्याचे ही वरक म्हणाले. अळ्यांपासून झाडांच्या संरक्षणासाठी आम्ही काही औषधांची फवारणी करून प्रयोग केला मात्र त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे ही वरक यांनी सांगितले. 

Kandlavan grow again Gain splendor in Mumbai Bay and Thane Bay

-----------------------------------------------------------

( संपादन - तुुषार सोनवणे )

loading image
go to top