Maratha Reservation Protest: मराठा मोर्चामुळे मुंबई ठप्प! आझाद मैदानातील व्यापाराला फटका, व्यापारी संघटना चिंतेत
Manoj Jarange Agitation: आझाद मैदानावर उसळलेल्या मराठा मोर्चामुळे येथील व्यापार क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे रोजगारावर परिणाम होत असून व्यापारी संघटना चिंता व्यक्त करत आहे.
मुंबई : आझाद मैदानावर उसळलेल्या मराठा मोर्चामुळे दक्षिण मुंबई अक्षरशः ठप्प झाली आहे. गर्दी अनियंत्रित झाली असून वाहतूक कोंडीमुळे रस्ते जाम झाले आहेत. जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच व्यापार क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे.