
Summary
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला यश मिळाले असून सरकार हैद्राबाद व सातारा गॅझेट अंमलबजावणीचा जीआर देणार आहे.
जीआर मिळाल्यानंतर जरांगे यांनी रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई सोडण्याची घोषणा केली आहे.
आंदोलकांच्या गाड्यांवर कारवाई न करण्याचे आदेश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
मनोज जरांगे यांचे आझाद मैदानावरील उपोषण यशस्वी झाले असून काही वेळात त्यांना हैद्राबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीचा जीआर त्यांना दिला जाणार आहे. दरम्यान जीआर मिळताच रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई सोडणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची आझाद मैदानावरील भेट घेऊन त्यांना प्रस्ताव दिला. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.