
मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावरील आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू असून पोलिसांकडून परवानगी कायम आहे.
मध्यरात्री मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांना बोलावण्यात आले, तर आंदोलकांचे हाल सुरूच आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील व गिरीश महाजन यांनी वर्षा निवासस्थानी आंदोलनावर तासभर चर्चा केली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे, मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय हलणार नाही असा ठाम निर्धार जरांगे यांनी केला आहे. आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून आजही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान मध्यरात्री मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले.