
Summary
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणानंतर सरकारने ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्या.
बलिदान दिलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शैक्षणिक पात्रतेनुसार वारसांना एमआयडीसी, महावितरण, राज्य महामंडळात नोकरी मिळणार आहे.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी केलेल्या आमरणा उपोषणाला यश आले असून सरकारने त्यांच्या ६ पैकी ८ मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी द्यावी अशी मागणीही यावेळी त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. त्याही मागणीवर होकार मिळाला आहे.