मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. आजपासून त्यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. अशातच त्यांच्या आंदोलनाला आता एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. काही अटींसह ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आजचा मुक्काम आझाद मैदानातच राहणार आहे.