
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू करण्यापूर्वी रात्रभर झोप न लागल्याने गाडीतच विश्रांती घेतली.
पुणे जिल्ह्यात व मुंबईच्या वेशीवर सत्कारांमुळे त्यांना नीट झोप झाली नाही, तरीही उत्साह टिकवण्यासाठी त्यांनी गाडीत 3–4 तास झोप घेतली.
लाखो मराठा बांधव मुंबईत पोहोचले असून आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा आंदोलक मुंबईत धडकले आहेत. सकाळी दहा वाजता मनोज जरांगे आपल्या उपोषणच्या आंदोलनाला सुरुवात करतील. दरम्यान मुंबईच्या दिशने निघाल्यापासून मनोज जरांगे यांना रात्रभर झोप लागली नाही, त्यामुळे त्यांनी सकाळी आझाद मैदानात पोहोचण्याआधी गाडीतच झोप काढली.