
मुंबई उच्च न्यायालयाने आज आंदोलनकर्त्यांना आणि राज्य सरकारला कडक शब्दांत इशारा देताना, बेकायदेशीर आंदोलन तत्काळ थांबवण्याचे आणि जागा खाली करण्याचे निर्देश दिले. आंदोलनाला केवळ एका दिवसाची परवानगी होती, तरीही ते अनधिकृतपणे सुरू आहे, यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने राज्य सरकारला 3 वाजेपर्यंत आंदोलनाविरोधात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, अन्यथा कोर्ट स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेईल, असा इशाराही दिला.