Manoj Jarange Patil refuses to drink water during Maratha reservation protest at Azad Maidan : मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केलं आहे. ते मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आजपासून त्यांनी पाणी न पिण्याचाही निर्णय घेतला आहे. डॉक्टरांनी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली. मात्र, ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. अशातच त्यांच्या प्रकृतीबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.