Cabinet Meeting Discusses Over Maratha Reservation
esakal
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमधील तणाव पुन्हा वाढताना दिसत आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जरांगे यांच्या सरकारविरोधी भूमिकेवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीचं नियमित कामकाज संपल्यानंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं आणि त्यानंतर या विषयावर मंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.