
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी उद्यापासून पाणी बंद करून आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. जरांगे यांनी सरकारला थेट आव्हान देत म्हटले आहे, “आरक्षण मिळाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही.”