NIA कडून मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची तब्बल अडीच तास चौकशी

mansukh.jpg
mansukh.jpg

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांचा झालेला संशयास्पद मृत्यू, परस्परांशी संबंधित असलेल्या या दोन घटनांभोवती सध्या राज्याचे राजकारण फिरत आहे. अँटिलिया बाहेर सापडलेल्या SUV कारचा तपास NIA कडे आहे, तर मनुसख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास ATS करत आहे. मनसुख हिरेन यांचा चार मार्च रोजी ठाणे खाडीत मृतदेह सापडला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पाच सदस्यांच्या पथकाने मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची तब्बल अडीच तास चौकशी केली. 

बुधवारी दहशतवाद विरोधी पथकाने हिरेन कुटुंबियांची तब्बल पाच तास चौकशी केली होती. आजही मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसने हिरेन कुटुंबियांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. भाऊ विनोद आणि मुलगा मितला एटीएस चौकशीसाठी घेऊन आले.   

NIA ने आपल्या तपासाबाबत काहीही माहिती दिलेली नाही. एनआयएचे पथक मृतदेह सापडला, त्या ठाणे खाडीच्या ठिकाणी सुद्धा गेले होते. "एनआयएचे पथक हिरेन यांच्या निवासस्थानी दुपारी २.३० च्या सुमारास पोहोचले. तिथे हे पथक पाच वाजेपर्यंत होते" अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिली. "मनसुख हिरेन यांच्यासोबत नेमकं काय घडलं? त्यासाठी आम्ही फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहोत" असे एका नातेवाईकाने सांगितले. 

मी मनसुख हिरेन यांची कार वापरली नाही - सचिन वाझे 
नोव्हेंबर महिन्यापासून आपण मनसुख हिरेन यांची स्कॉर्पियो कार वापरलेली नाही असे सचिन वाझे यांनी एटीएसच्या चौकशीत सांगितले. हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी एटीएसला दिलेल्या जबानीत सचिन वाझे आपल्या नवऱ्याची स्कॉर्पियो कार वापरत होते, असे सांगितले. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन परस्परांना ओळखत होते. पोलीस दलातील अनेक अधिकारी हिरेन यांना ओळखत होते, असे वाझेंनी एटीएस अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. विमला यांनी सचिन वझे यांच्यावर नवऱ्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com