"शिवसेनेने केलेली पापं..."; भाजपच्या प्रसाद लाड यांची खोचक टीका

"शिवसेनेने केलेली पापं..."; भाजपच्या प्रसाद लाड यांची खोचक टीका

मुंबई: उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये स्फोटके सापडली होती. त्या प्रकारानंतर कारचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला. यातील स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास NIAकडे होता तर हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र ATSकडे होता. पण काही दिवसांपूर्वी दोन्ही प्रकरणांचा तपास NIAकडे आला. त्यानंतर हिरेन  मृत्यूप्रकरणी NIAने रविवारी बीकेसी परिसरातील मिठी नदीत शोधकार्य करत महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले. सचिन वाझेने गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे मिठी नदीत फेकल्याचे समजल्यानंतर ही शोधमोहिम राबवण्यात आली होती. या प्रकरणावरून भाजपच्या प्रसाद लाड यांनी शिवसेनेला टोला लगावला.

सचिन वाझेने नदीत टाकलेले डीव्हीआर, लॅपटॉप आणि आणखी काही गोष्टी आज मुंबईच्या मिठी नदीत सापडल्या. खरं तर, मुंबई महापालिका प्रशासन गेले अनेक महिने मिठी नदी साफ का करत नाही असा प्रश्न साऱ्यांना पडला होता. त्याचं उत्तर आज साऱ्या जनतेला मिळालं. यांची केलेली पापं मिठी नदीत टाकली होती. मिठी नदी साफ केली तर ही पापं जनतेसमोर येतील आणि यांचं बिंग फुटेल म्हणूनच मिठी नदी साफ केली जात नव्हती", अशी खोचक टीका लाड यांनी केली.

"सचिन वाझेने हिरेन प्रकरणात केलेलं जे महाघाणेरडं कृत्य आहे ते साऱ्यांसमोर उघड झालं आहे. या प्रकरणात राजकीय वरदहस्त कोणाचा आहे हेदेखील लवकरच समोर येईल. सचिन वाझेची पाठराखण करणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी आता आपली चूक मान्य करावी. तसेच जनतेची आणि विधानसभेची माफी मागावी, अशी मागणीही प्रसाद लाड यांनी केली.

मनसुख हिरेन हत्येच्या तपासासाठी NIAने डायव्हर्ससह स्थानिक मच्छिमारांचीही मदत घेतली. सुमारे तीन तासांच्या शोधकार्यानंतर मिठीनदीच्या खाडीतून कॉम्प्युटरचे दोन सीपीयु, एकसारखेच रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या दोन नंबर प्लेट, एक हार्ड डिस्क ड्राइव्ह, दोन डीव्हीआर, एक लॅपटॉप, एक प्रिंटर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com