मनसुख यांच्या डायटॉम टेस्टवरुन भाजपाचा जे.जे. रुग्णालयावर गंभीर आरोप 

ashish-shelar.jpg
ashish-shelar.jpg

 मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाच्या डायटॉम टेस्टवरुन भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जे.जे. रुग्णालयावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत सापडला होता. मनसुख हिरेन यांनी पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली आहे का? हे तपासण्यासाठी मृतदेहाची डायटॉम टेस्ट करण्यात आली. डायटॉम टेस्टमधुन मृत व्यक्तीच्या  फुफ्फुसांमध्ये पाणी होतं का? हे तपासलं जातं. मान्यताप्राप्त प्रयोगशाळाच ही टेस्ट करु शकते. मनसुख यांच्या अवयवांचे नमुने कलिना फॉरेन्सिक लॅबला पाठवल्यानंतर त्यांनी आम्ही ही चाचणी करु शकत नाही, हे स्पष्टपणे सांगितलं. 

जे.जे. हॉस्पिटलमध्ये डायटॉम टेस्ट होऊ शकत नाही, मग तरीही तिथे ही चाचणी का केली? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांना ही टेस्ट आपल्या इथे होऊ शकत नाही, हे माहित असतानाही त्यांनी ही टेस्ट का केली? टेस्ट केल्यानंतर ही स्क्रिनिंग टेस्ट होती, असे सांगितले. या टेस्टच्या माध्यमातून अवयवांच्या पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आशिष शेलार यांनी केला. रुमाल गायब करणं, पुरावे नष्ट करणं, छेडछाड करणं या सर्व गोष्टी स्थानिक पोलिसांनी केल्या. 


ATS ने २० मार्चला सहा वेगवेगळया ठिकाणी छापे मारले. सरकारी पंचांची मागणी केली. ATS च्या  सहा टीम्स छाप्यासाठी तयार केल्या होत्या. पण सरकारी निर्देशानुसार त्यांना थांबवण्यात आलं. ATS चे छापे रोखण्यात आले. त्यांना हे आदेश कोणी दिले? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com