मनसुख हिरेनच्या हत्येच्या दिवशी सचिन वाझे चेंबूरला कोणाला भेटले?

मनसुख हिरेनच्या हत्येच्या दिवशी सचिन वाझे चेंबूरला कोणाला भेटले?

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एटीएसच्या रिमांडमध्ये घटनास्थळी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे उपस्थित होते अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसंच हत्येच्या दिवशी म्हणजेच 4 मार्चला वाझे संपूर्ण दिवस त्यांच्या कार्यालयात होते असे त्यांनी सांगितलं. मात्र सचिन वाझे यांचं लोकेशन तपासले असता. वाझे दुपारी चेंबूर MIDC मध्ये होते. वाझे त्या दिवशी दुपारी 12 वाजून 48 मिनिटांनी चेंबूरमध्ये नेमकं कोणाला भेटायला आले होते. याचाच आता शोध सुरू आहे.

ज्या रात्री मनसुख बेपत्ता झाले. त्यावेळी तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन येईल याची पूर्व कल्पनाही वाझेनं मनसुखला दिली होती. वाझे या प्रकरणात मनसुखला अटक होण्यास सांगून बेलवर बाहेर काढण्याचे आश्वासन देत होते. मात्र मनसुखच्या पत्नीला हे मान्य नव्हतं. म्हणूनच वाझेनं मनसुखला त्यांच्या पत्नीला घराबाहेर पडताना क्राईम ब्रांन्चच्या अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलावलं आहे असं सांगण्यास, सांगितलं होतं. अशी माहिती ATS च्या तपासात समोर आली आहे. 

मनसुख ज्यावेळी भेटायला गेला, त्यावेळी गाडीत बसवून वाझे त्यांच्या आँडी कारनं मुंबईत बारवर रेड करायला निघाला आणि त्याची कार मुलुंड टोल नाक्यावरील CCTV ही कैद झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या गाडीचा NIA आणि ATS मागील अनेक दिवसांपासून शोध घेत आहेत.

मुंबईत आल्यानंतर प्रथम वाझेनं आपले मोबाईल जाणून बुजून कँबिनमध्ये चार्जिंगला लावून ठेवले आणि कारवाईसाठी निघून गेले. कारण मोबाईलचं लोकेशन काढलं गेलं तर वाझे त्या रात्री पोलिस मुख्यालयात होता असे निदर्शनास येईल. 

मनसुख यांची हत्या करून त्यांच्या तोंडावर रुमाल ठेवून नंतर स्कार्प सारखा मास्क लावण्यात आला आणि मृतदेह खाडीत फेकल्याची माहितीही सुत्रांकडून समजतेय. मनसुखच्या हत्येनंतर त्याच्या मोबाईलमधले सिमकार्ड वेगवेगळ्या मोबाईलमध्ये टाकण्यात आले आणि काही वेळासाठी ते वसईमधल्या मांडवी गावात काही वेळासाठी मोबाईल सुरू करण्यात आला आणि पुन्हा बंद केला असं सांगितलं जात आहे. 

हे सगळं झाल्यानंतर वाझे पुन्हा ठाण्यातून मुंबईच्या दिशेने निघाले आणि रात्रीच्या सुमारास डोंगरी परिसरात रेड सुरू होती असे भासवून त्यांनी डोंगरी पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये नोंद केली, अशी माहिती समोर येत आहे. या सगळ्या प्रकरणात वाझे यांचा महत्वाचा रोल आहे म्हणून ते मुख्य आरोपी आहेत अशीही माहितीही सुत्रांनी दिली आहे. 

Mansukh hiren March 4 died day Sachin waze said he was in office all day

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com