मनसुख हिरेन हत्या: प्रदीप शर्मा मुख्य सूत्रधार; NIA कडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pradip sharma

मनसुख हिरेन हत्या: प्रदीप शर्मा मुख्य सूत्रधार; NIAचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास पथकानं अर्थात NIA नं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं असून यामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं आहे. (Mansukh Hiren Murder Case Pradeep Sharma mastermind NIA affidavit Mumbai High Court)

हेही वाचा: सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला पण आम्ही न्याय देणार - चंद्रकांत पाटील

NIA नं प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय?

NIA नं मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एन्काऊन्टर स्पेशालिस्ट असलेले प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. प्रतिज्ञापत्रात पुढे असंही म्हटलं की, कथित कट मुंबई पोलीस आयुक्ताच्या इमारतीत रचण्यात आला होता. या ठिकाणी प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींमध्ये अनेक बैठक पार पडल्या.

दरम्यान, एपीआय सचिन वाझेनं मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मा यांना 45 लाख रुपये दिले.प्रदीप शर्मा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर NIA नं हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे. हायकोर्टानं या प्रकरणाची सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे.

Web Title: Mansukh Hiren Murder Case Pradeep Sharma Mastermind Nia Affidavit Mumbai High Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top