सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला पण आम्ही न्याय देणार - चंद्रकांत पाटील

राज्यातील रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
chandrakant patil
chandrakant patil sakal

कोल्हापूर : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दिला आहे. यावरुन भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसलाय पण आम्ही त्यांना न्याय देऊ, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (govt stabbed OBC from back but we will give justice to them says Chandrakant Patil)

chandrakant patil
मलवीय यांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप; म्हणाले, प्रादेशिक अखंडतेवर...

पाटील म्हणाले, सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर ओबीसींचं राजकीय आरक्षण आम्ही देणार आहोत असं सरकारमधील मंडळी कायमच सांगत होती. पण हे सांगत असताना त्यांनी काम काही केलं नाही. दोन वर्षात एक कणभरही काम त्यांनी केलेलं नाही. कोर्टानं त्यांना ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती. यातील पहिला मुद्दा डेडिकेटेड वेगळा आयोग वापरा असा होता पण तो काल-परवा सरकारनं तयार केला. दुसरा मुद्दा इम्पिरिकल डाटा गोळा करावा हा होता पण त्याचाही अद्याप पत्ता नाही. त्यामुळं कोर्टानं आज वैतागून निर्णय दिला की, येत्या आठवड्याभरात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात यावीत. ही सरकारनं ओबीसींची केलेली प्रचंड मोठी फसवणूक आहे. सरकारनं ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हे सरकार त्यासाठीच प्रसिद्ध आहे.

chandrakant patil
राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा; SCचे महत्वाचे आदेश

सुप्रीम कोर्टानं सरकारला या विषयावर जेवढं ऐकवायचं तेवढं ऐकवलं आहे. फक्त प्रशासक नेमायचा आणि त्यामाध्यमातून पालमंत्र्यानी संबंधीत महानगरपालिका चालवायची. यामुळं ओबीसींचं मोठं नुकसान झालंय. पण भाजप या सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देणार. भाजपचं सर्व समाजात काम आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळं गेलं आम्ही मात्र त्यांना न्याय देणार, असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com