esakal | मला कसे मंत्रालयात येता येईल?, ड्रेसकोडच्या मुद्द्यावरुन आठवलेंचा सरकारला चिमटा
sakal

बोलून बातमी शोधा

मला कसे मंत्रालयात येता येईल?, ड्रेसकोडच्या मुद्द्यावरुन आठवलेंचा सरकारला चिमटा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या ड्रेसकोडच्या मुद्दयावरुन राज्य सरकारला चिमटा काढला आहे. 

मला कसे मंत्रालयात येता येईल?, ड्रेसकोडच्या मुद्द्यावरुन आठवलेंचा सरकारला चिमटा

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  मंत्रालयात येण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारनं मंत्रालयात येताना कोणते कपडे घालावे यासाठी निर्देश जारी करण्यात आलेत. सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही. त्यासोबतच स्लीपर्सही न वापरण्याच्या सूचना मंत्रालयानं जाहीर केलेल्या निर्देशात दिल्या आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या ड्रेसकोडच्या मुद्दयावरुन राज्य सरकारला चिमटा काढला आहे. 

राज्य सरकारला चिमटा काढणारं ट्विटचं रामदास आठवले यांनी केलं आहे. राज्यसरकार ने  मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाोई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?, असं मिश्किल ट्विट रामदास आठवले यांनी केलं आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची तसंच व्यक्तीमत्त्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून केली जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत जर अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा अशोभनीय किंवा गबाळी तसंच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम कामकाजावर देखील होत असतो. म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार केला असता मंत्रालय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयात असणारे अधिकारी, कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव एकंदरीत कशा पद्धतीनं असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना सरकारकडून देण्यात आल्यात. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ड्रेसकोडचे नवीन नियम 

  • परिधान केलेला पेहराव स्वच्छ आणि नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी.
  • पुरूष कर्मचाऱ्यांनी  शर्ट आणि पॅंट घालावी.
  • जीन्स आणि टी शर्ट घालू नये.
  • महिला कर्मचाऱ्यांनी साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालावे.
  • कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा 
  • पुरुष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा.
  • गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत.
  • खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.

mantralaya new dresscode issue ramdas athawale cirtcism state government twitter