ठाण्यात कोरोनाचा कहर, चार दिवसात 172 जणांचा कोरोनाने मृत्यू

राहुल क्षीरसागर
Sunday, 11 October 2020

अवघ्या चार दिवसात 172 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, याच कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात सर्वाधिक 48 जणांचा या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

मुंबईः  ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना, दुसरीकडे कोरोना या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. त्यात जिल्ह्यात काही दिवसांपासून जिल्ह्यात तिशीच्या आत असलेल्या मृतांच्या आकडेवारीने 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत चाळीशीचा टप्पा पार केला आहे. अवघ्या चार दिवसात 172 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, याच कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात सर्वाधिक 48 जणांचा या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन अहोरात्र लढा देत आहेत. मात्र, जिल्ह्यात कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हे दिसून येत नाही. त्यात ज्यावेळी जिल्ह्यातील ठाणे, कल्याण – डोंबिवली, नवी मुंबई आणि भाईंदर या चार प्रमुख महानगर पालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत होता. त्यावेळी ग्रामीण परिक्षेत्रात मात्र, कोरोनाने नुकताच शिरकाव केला होता. तर, अनेक तालुके आणि गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने ग्रीन झोन मध्ये या गावांचा आणि तालुक्यांचा समावेश होता. मात्र, आजच्या घडीला जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात दरदिवशी कोरोनाचा रुग्ण संख्येत होणारी चढउतार काहीसा दिलासा तर, काही वेळा चिंता वाढवीत असते. त्यात साध्याघाडीला जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या एक लाख 90 हजारांच्या घरात पोहोचली आहे. तर, मृतांचा आकडा 4 हजार 816 इतका झाला आहे. 

अधिक वाचाः  कांजूरमार्गच्या जमिनीबाबत मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत; भाजप आमदाराची टीका

दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येसह या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या आटोक्यात होती. त्यात जिल्ह्यात काही दिवसांपासून जिल्ह्यात तिशीच्या आत असलेल्या मृतांच्या आकडेवारीने 7 ऑक्टोबर पासून चाळीशीचा टप्पा पार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या चार दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात 172 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, याच कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात सर्वाधिक 48 जणांचा या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत 32, ठाणे महापालिका क्षेत्रात 26 तर, नवी मुंबईत 21 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यात बाधित रुग्णांसह त्यांच्य मृत्युच्या संख्येत देखील होणारी वाढ आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Thane district 172 people died due corona four days highest death toll 48 rural areas


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane district 172 people died due corona four days highest death toll 48 rural areas