मुंबईतील खासगी रुग्णालये सुरु; पण...

doctor
doctor

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कठोर आदेशानंतर मुंबई महापालिका क्षेत्रातील 75 टक्के रुग्णालय सुरु झाली, मात्र अनेक रुग्णालयांना आरोग्य कर्मचाऱ्यांची चणचण भासत आहे. एवढेच नव्हे तर कर्मचारी सुरक्षेची साधने पुरवण्याची मागणी करीत असल्याने प्रश्न कायम असल्याचे सांगितले जात आहे.  

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक रुग्णालये बंद असल्याने कोरोना व्यतिरिक्त अन्य रोगांवरील उपचारात अडचणी येत होत्या. त्यामुळे मुंबई महापालिकेने जीवनावश्यक सेवेच्या कायद्याच्या आधारे खासगी दवाखाने तसेच रुग्णालय सुरु करण्याचे आदेश दिले. मात्र मुंबईत सुमारे तीनशे आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रग्णालयातील कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत, असे वृत्त आहे.

गोरेगावमधील एका रुग्णालयातील नर्स तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी लोकल सुरु होईपर्यंत कामावर येण्यास नकार दिला आहे. त्यांनी बेस्टच्या बसचा पर्याय नाकारला आहे. त्या जीवनावश्यक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच राखीव आहेत आणि त्यात गर्दी असल्यामुळे धोका जास्त आहे असे सांगितले. त्याचबरोबर कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षा किट दिला तर आम्ही कामावर रुजू होण्यास तयार आहोत, असेही सांगितले आहे.

लॉकडाऊनमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.  त्याच्या प्रवासाची व्यवस्था केल्यावरच दवाखाने, नर्सिंग होम तसेच रुग्णालये सुरु करण्याची सक्ती करणे योग्य होईल, असेही काही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास त्यांच्या घरातून विरोध होत आहे. तुम्हाला लागण झाल्यास त्याचा फटका घरातील सर्वांना बसेल, असेही अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com