esakal | कोरोनावरील अंतिम पर्याय 'हर्ड इम्युनीटी'चा ? पण, 'हर्ड इम्युनिटी' म्हणजे काय रे भाऊ?
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनावरील अंतिम पर्याय 'हर्ड इम्युनीटी'चा ? पण, 'हर्ड इम्युनिटी' म्हणजे काय रे भाऊ?

भारतीयांना कोरोनापासून दूर ठेवणार 'हर्ड इम्युनिटी'? जाणून घ्या महत्वाची माहिती...

कोरोनावरील अंतिम पर्याय 'हर्ड इम्युनीटी'चा ? पण, 'हर्ड इम्युनिटी' म्हणजे काय रे भाऊ?

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात पसरला आहे. त्यात अजून कोरोना व्हायरसवर कुठल्याही प्रकारचं औषध तयार झालं नाहीये. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र काही लोकं आपल्या उत्तम रोगप्रतिकारक क्षमतेमुळे कोरोनावर मात करण्यात यशस्वी होत आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतीयांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक वेगळी रोगप्रतिकारक क्षमता कामी येऊ शकते. ज्याचं नाव 'हर्ड इम्युनिटी' असं आहे.

ब्रिटनच्या प्रिंस्टन युनिव्हर्सिटी आणि सेंटर फॉर डिजीज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) च्या काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हर्ड इम्युनिटीचा भारतीयांना सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. यामुळे भारतीय जनता कोरोनापासून बचाव करू शकणार आहे.

तिसरा Lockdown ?  गृहमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत...

काय आहे 'हर्ड इम्युनिटी':

हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती. ज्यात 'हर्ड'चा अर्थ समूह असा होतो. ब्रिटनच्या प्रिंस्टन युनिव्हर्सिटी आणि सेंटर फॉर डिजीज डायनेमिक्स, इकोनोमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) च्या वैज्ञानिकांच्या मते जर कोरोना व्हायरसला अगदी सीमित प्रमाणात ज्यांची रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे  अशांमध्ये पसरू दिलं तर सामूहिक रित्या त्या सर्वांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होऊ शकते. भारतासारख्या देशात हे करणं शक्य आहे असंही ते म्हणालेत.

अशी काम करते 'हर्ड इम्युनिटी':

हर्ड इम्यूनिटीमध्ये नागरिकांना कोरोना व्हायरसला एक्सपोज केलं जातं. म्हणजेच काय तर सोशल डिस्टंसिंग चे नियम न पाळता लोकांना कोरोना संसर्ग होऊ दिला जातो. ज्यामुळे सुरवातीला हा व्हायरस लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमित होतो. हळू हळू शरीर स्वतःच या व्हायरस विरोधात अँटीबॉडी तयार करायला सुरवात करतं. आणि थोड्या दिवसानंतर आपल्या शरीरातील अँटीबॉडी आणि रोगप्रतिकारक क्षमतेमुळे आपलं शरीर नवीन व्हायरस सोबत 'इम्यून' होतं. म्हणजेच काय तर शरीर या व्हायरस सोबत जगायला शिकतं. सोशल डिस्टंसिंग न पाळल्यामुळे आपलं आपल्या शरीरात विविधी लोकांच्या माध्यमातून व्हायरसची देवाण घेवाण होते. मात्र आपल्या शरीरात आधीच असलेल्या रोगप्रतिकारक क्षमतेमुळे आपल्या शरीराला या व्हायरस सोबत लढता येतं. वारंवार असं झाल्याने हा व्हायरस निष्प्रभ होतो. 

अरे बापरे ! चोराला झाली कोरोनाची लागण, २४ पोलिस आणि कोर्टाचा स्टाफ क्वारंटाईन...

तरुणांचे प्रमाण ५० टक्के 

भारतात तरुणांचं प्रमाण ५० टक्के पेक्षा अधिक आहे. त्यामुळे इथे तरुणांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. जर येणाऱ्या काळात हा हर्ड इम्युनिटी वाढवण्याचा प्रयोग भारतात करण्यात आला तर येणाऱ्या काही दिवसांत भारतात ६० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनमुक्त होऊ शकतील. तसंच भारतातून कोरोनाचं संकट नोव्हेंबरच्या आधी संपूर्णपणे निघून जाईल असं अभ्यासक म्हणतायत.  

मात्र हे वाटतं तितकं सोपं नाही:

भारतात किंवा अन्य कुठल्याही देशात हर्ड इम्युनिटी वाढवण्याचा उपाय करणं हे धोकादायक आहे. कोरोनाला सीमित क्षेत्रात पसरवणं आणि यातून अँटीबॉडीज तयार करणं सोपं काम नाहीये. हा उपाय केला तर काही जणांचे प्राण जाऊ शकतात असं काही वैज्ञानिकांनी स्पस्ट केलं आहे.

भारतात असणाऱ्या तरुणांचे प्राण धोक्यात घालून हा उपाय करणं योग्य नाही असंही काही वैज्ञनिकांचं मत आहे. हा उपाय करण्यासाठी तब्बल ८२ टक्के लोकांना याचा संसर्ग होण्याची गरज आहे जे धोकादायक आहे. त्यामुळे हा उपाय करण्याआधी भरपूर प्रश्नाचे उत्तरं शोधण्याची गरज आहे असं काही वैज्ञानिकांचं मत आहे.  

'हर्ड इम्युनिटी'मुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी फायदा होऊ शकतो मात्र अशाप्रकारे अँटीबॉडीज तयार करणं धोकादायक ठरू शकतं.

what is herd immunity and what experts think about herd immunity and use in india  

loading image
go to top