लॉकडाऊनमध्येही डोंबिवलीत एवढे साधू आलेत कुठून ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा वाजवणारी घटना आज मुंबईत घडली आहे. सरकारनं आणि प्रशासनानं बंदी घालूनही अनेक जैन साधू एका ठिकाणी धार्मिक विधीसाठी जमल्याची माहिती समोर येतेय.

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस आणखीनच वाढत चालला आहे. गेल्या तब्बल ६५ दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका, गर्दी करू नका, सोशल डिस्टंसिंगचं वेळोवेळी पालन करा असं सरकारकडून वेळोवेळी सांगण्यात येतंय. आतापर्यंत या गोष्टींचं पालन न केल्यामुळे काही जणांवर कारवाईही करण्यात आली आहे. मात्र काहींना या गोष्टी कधी कळणार असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.  

सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा वाजवणारी घटना आज मुंबईत घडली आहे. सरकारनं आणि प्रशासनानं बंदी घालूनही अनेक जैन साधू एका ठिकाणी धार्मिक विधीसाठी जमल्याची माहिती समोर येतेय. लॉकडाऊनमुळे सर्व धार्मिक स्थळ बंद करण्यात आली आहेत. गर्दी होऊ नये म्हणून लोकांना या धार्मिक स्थळी जाण्याची बंदी घालण्यात आली आहे. मात्र आज हे जैन साधू  मोठ्या प्रमाणात एकत्र आले असा आरोप या भागात राहणाऱ्या लोकांनी केला आहे. 

हेही वाचा: आता मास्क वापरण्याची गरज नाही, कारण बाजारात आलं आहे 'असं' भन्नाट काही...

काय आहे प्रकार: 

डोंबिवलीमधल्या भोपरच्या लोढा परिसरात जैन मंदिरात गुरुवारी सकाळी अनेक साधू एकत्र आले. हे सर्व साधू मुंबईमधल्या कंटेनमेंट झोनमधून आल्याचा आरोप या भागात राहणाऱ्या लोकांनी केला आहे. धार्मिक विधीसाठी हे जैन साधू मुंबईतल्या घाटकोपर या कंटेंनमेंट झोनमधून आल्याचं इथल्या लोकांनी म्हटलं आहे. या साधूंपैकी कोणी कोरोनाग्रस्त असेल तर संपूर्ण भागात कोरोना पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

हेही वाचा: नवी मुंबईत उभारले खास कोव्हिड रुग्णालय; 'इतक्या' खाटांची असणार क्षमता

पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात जैन साधू एकाच ठिकाणी जमा झाले असा आरोप इथल्या नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी या जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी पदाधिकारी भद्रेश जोशी यांच्याविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.    

many jain monks had gather togather in mumbai read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many jain monks had gather togather in mumbai read full story