लॉकडाऊन कालावधीत उपचारास विलंब, नवी मुंबईतील 20 रुग्णांवर किडनी गमावण्याची वेळ

लॉकडाऊन कालावधीत उपचारास विलंब, नवी मुंबईतील 20 रुग्णांवर किडनी गमावण्याची वेळ

मुंबई - 24: संपूर्ण जगानेच न भूतो न भविष्यती असा कोरोना संक्रमणाचा काळ अनुभवला, लॉकडाउन म्हणजे आपल्याच घरातच बंदिवान बनण्याचा अनुभव भारतातील नागरिकांनी घेतला. महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनचा कालावधी हा सहा महिन्यांहून अधिक होता आणि आजही अनेक बंधने स्वीकारून आपण अनलॉकला सामोरे जात आहोत. या सहा महिन्याच्या लॉकडाऊनमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या, अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणीशिवाय प्रवेश मिळत नव्हता तर अनेक गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना कोरोनाच्या भीतीमुळे उपचार पुढे ढकलावे लागले.

हृदयविकार, किडनी तसेच पोटाचे विकार असणाऱ्या रुग्णांना याचा जास्त फटका बसला असून आजही हॉस्पिटलमध्ये नॉन कोव्हीड सुविधा सुरु झाल्या असल्या तरीही अनेक रुग्ण कोरोनाच्या भीतीने उपचार करण्यासाठी आजही घाबरत आहेत व त्यामुळे शरीरातील अनेक आजार वाढून अनेक गंभीर व्याधी वाढू लागल्या आहेत. 

नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरतर्फे नॉन कोव्हीड रुग्णांचे एक सर्वेक्षण केले असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे मूत्रविकारतज्ञ व शल्य चिकित्सक डॉ. निशांत काठाळे म्हणाले, "लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका हा किडनीच्या समस्या असणाऱ्या रुग्णांना बसला असून कोरोनाच्या भीतीने हे रुग्ण आजही उपचारासाठी बाहेर येताना घाबरत आहेत. लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर आम्ही अनेक किडनीच्या समस्या असणाऱ्या रुग्णांचे सर्वेक्षण केल्यावर त्याच्या शारीरिक समस्यांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आले. मुख्यतः किडनीच्या समस्या असलेले ज्येष्ठ नागरिक खूपच हतबल झालेले दिसले.

जुईनगर येथे राहणाऱ्या कांचन देसाई (नाव बदलेले आहे)  वय 66 यांना उच्च मधुमेह होता परंतु त्या उपचारासाठी तीन महिने उशीरा आल्यामुळे त्याना एम्फीसेमॅटस पायलोनेफ्रायटिस हा किडनीचा आजार झाला. या आजाराच्या विषाणूमुळे त्यांची डावी किडनी खराब झाली कारण या किडनीमध्ये पु आणि गॅस तयार झाला होता. अशा केसमध्ये रुग्णाचे वय पाहता शस्रक्रिया करणे हाच एक मोठा धोका असतो. परंतु, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डाॅक्टरांनी या महिलेचे प्राण वाचवले. 

दुसऱ्या एका केसमध्ये उरण येथील सुभाष भोईर (नाव बदललेले) वय 72 यांना मार्चमध्ये एक मोठा किडनीस्टोन झाल्याचे निदान झाले होते आणि त्यांना किडनीस्टोन काढण्यासाठी शल्यचिकित्सा करण्यास सांगितले होते परंतु कोरोना संक्रमणामुळे त्यांनी ही शल्यचिकित्सा पुढे ढकलली, काही दिवसांनी त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्या उजव्या किडनीमध्ये पु व जंतुसंसर्ग झाला होता कोरोनामुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्यांच्यावर आधुनिक उपचार करणे कठीण झाले होते, अशावेळी त्यांच्या उजव्या किडनीमध्ये डीजे स्टेंट बायपास करण्याचा निर्णय घेतला आणि ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांची किडनी वाचवण्यात यश आले आहे. लॉकडाउन काळामध्ये उपचारास विलंब झाल्यामुळे नवी मुंबईतील 15 ते 20 नागरिकांनी किडनी गमावल्याची शक्यता आहे, कदाचित हा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे.

भारतातील कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1.8 % आहे जर आपण भारतातल्या सर्व  रूग्णांची तपासणी केली तर हा  मृत्युदर 1% पेक्षा खूपच कमी येईल परंतु किडनीच्या आजारामुळे भारतातील 5 ते 10 टक्के नागरिक हे आजारी आहेत यातच कोरोना संक्रमणामुळे उपचारास विलंब झाल्यामुळे अनेकांवर किडनी गमावण्याची वेळ आली आहे अशी माहिती  मूत्रविकारतज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. निशांत काठाळे दिली. 

किडनीचे आरोग्य जर जपायचे असेल तर त्यावर तात्काळ उपचार करणे फार गरजेचे आहे आणि यासाठी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे किडनीच्या रुग्णांसाठी एका वेगळ्या वाॅर्डची सुविधा केली आहे. भारतामध्ये दरवर्षी किडनीच्या आजारामुळे 2 लाखांहून अधिक नागरिक मृत्यमुखी पडतात म्हणजेच दरदिवशी 547 हुन अधिक नागरिक किडनीच्या आजाराला बळी पडत आहे आणि हा आकडा लॉकडाउनमुळे वाढण्याची शक्यता आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

many people lost their kideny amid corona and lockdown says doctors

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com