esakal | मुंबई पोलिसांच्या कॉलरवर हात ! कारवाई केली म्हणून ट्राफिक हवालदाराला महिलेकडून मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोलिसांच्या कॉलरवर हात ! कारवाई केली म्हणून ट्राफिक हवालदाराला महिलेकडून मारहाण

गेल्या काही महिन्यात मुंबई पोलिसांना माफिया म्हणणं, मुंबई पोलिसांवर चिखलफेक करणे, यामुळे अशा प्रवृत्तीला बळ मिळतं. - संजय राऊत 

मुंबई पोलिसांच्या कॉलरवर हात ! कारवाई केली म्हणून ट्राफिक हवालदाराला महिलेकडून मारहाण

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मुंबईतील काळबादेवी परिसरात वाहतूक पोलिसाच्या कॉलरवर थेट हात घालण्यात आलाय. काळबादेवी परिसरात कर्तव्यावर असताना एकनाथ पोटे नामक ट्राफिक पोलिसाने वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीवर कारवाई करण्यास सुरवात केली. कारवाई करताना ट्राफिक पोलिसाने अपशब्द वापरलेत असं या महिलेलंचं म्हणणं आहे. दरम्यान या कारवाईचा राग आल्याने या महिलेने थेट पोलिसांच्या कॉलरवर हात टाकला. आरोपी महिला सादविका रमाकांत तिवारी हिने रस्त्यावर पोलिसांना मारहाण करण्यास सुरवात केली. या महिलेसोबत एक पुरुषही असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

याबाबत मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अधिक माहिती दिलीये. सदर घटना कालची असून कर्तव्यावर असताना ट्राफिक हवालदारानी हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वाराला हटकलं. दरम्यानच्या बाचाबाचीमध्ये सदर महिलेने हवालदारावर अतिशय आक्षेपार्ह पद्धतीने हल्ला चढवला. सदर महिलेला अटक करण्यात आलेली आहे. या महिलेला कोर्टासमोर हजर करून तिची पोलिस कस्टडी मागण्यात येणार आहे. या बाबतील प्रभावी कारवाई करण्यात येईल, असं विश्वास नांगरे पाटील म्हणालेत. पोलिसांवरील हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत असं देखील ते म्हणालेत.   

महत्त्वाची बातमी : आई म्हणावं का राक्षसीण? ऑनलाईन शाळेत उत्तर दिलं नाही म्हणून स्वतःच्या मुलीला पेन्सिलने भोसकलं आणि घेतलेत चावे
 

मुंबई पोलिसांवर केलेल्या चिखलफेकीचा परिणाम : 

या प्रकारावर शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा पद्धतीने देशातील कोणत्याही पोलिसांच्या कॉलरवर हात टाकणाऱ्यावर कारवाई केलीच पाहिजे. गेल्या काही महिन्यात मुंबई पोलिसांना माफिया म्हणणं, मुंबई पोलिसांवर चिखलफेक करणे, यामुळे अशा प्रवृत्तीला बळ मिळतं. पोलिसांना मारहाण करणे हे माथेफिरूपणाचं लक्षण आहे. राज्यातील, मुंबईतील पोलिस असुरक्षित आहेत असं अजिबात नाही. सदर महिलेला ताब्यात घेण्यात आलं असून तिच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल असं संजय राऊत म्हणालेत.

road traffic police hawaldar beaten by women in kalbadevi area case registered