Maratha Andolan Victory: एक्सप्रेस हायवेवर कोंडीची भीती! विजयाच्या पताका फडकवत मराठ्यांचा परतीचा प्रवास सुरु

Maratha Andolan Victory: एक्सप्रेस हायवेवर कोंडीची भीती! विजयाच्या पताका फडकवत मराठ्यांचा परतीचा प्रवास सुरु
Updated on

Maratha Andolan Victory: मनोज जरांगे - पाटील यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या असून त्याचा अध्यादेशही प्राप्त झाल्यामुळे मराठा बांधव जल्लोषात परतीच्या प्रवसाला निघाला. जोरदार घोषनाबाजी मराठा बांधवानी दुपारी 12 नंतर आपापल्या गावी रवाना झाले.

काहींनी आपला मुक्काम अजूनही नवी मुंबईतच ठोकला असून दुपारी 3 नंतर नवी मुंबई सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. आरक्षणा बाबतचा अध्यादेश हाती लागल्याने जल्लोष आपल्या गावीच साजरा करायचा त्यामुले अनेकांनी आपली वाहने गावाकडे वळवली.

Maratha Andolan Victory: एक्सप्रेस हायवेवर कोंडीची भीती! विजयाच्या पताका फडकवत मराठ्यांचा परतीचा प्रवास सुरु
Maratha Andolan Victory: अखेर जरांगे पाटील यांनी आंदोलन घेतलं मागे; उपोषण सोडून CM शिंदेंच्या हस्ते जीआर स्वीकारला

तर काहींनी दुपार नंतर वाहतूक कोंडी च्या भीतीपोटी आरक्षणाचा निकाल हाती येताच गावाकडे कूच केली.

आमचा नेता इमानदार असे फलक व भगवे झेंडे फडकवणारा मराठा बांधव व त्याचे सहकारी जोशात घोषणाबाजी देत पुणे, सातारा, मराठवाडा, कोल्हापूर कडे निघाले. चारचाकी वाहने, दुचाकी, टेम्पो, ट्रॅक्टर आदी वाहनावर जल्लोषाचा गुलाल व मनोज जरांगे पाटील ह्यांचा विजय असो अशा घोषणा असमंत गर्जत होत्या.

Maratha Andolan Victory: एक्सप्रेस हायवेवर कोंडीची भीती! विजयाच्या पताका फडकवत मराठ्यांचा परतीचा प्रवास सुरु
Maratha Andolan Victory: आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला काय मिळणार? CM शिंदेंनी सांगितली अध्यादेशातली तरतूद

ठिकठिकाणी परतीच्या प्रवसाला निघालेल्या मराठा बांधवाना त्यांची वाहने थांबवून पाणी व जेवणाची शिदोरी दिली जात होत होती.काहींनी तर जल्लोष साजरा करण्यासाठी गाडीत लावलेल्या साउंड सिस्टीमच्या तालावर चांगलाच ठेका धरला होता.

तर काहींनी जरांगे ह्यांच्यावर आधारित गाणी लावून आनंद साजरा करत प्रवासाला निघाले.घरी पोहचून पुन्हा आनंद साजरा करावयाचा असल्याने अनेकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

Maratha Andolan Victory: एक्सप्रेस हायवेवर कोंडीची भीती! विजयाच्या पताका फडकवत मराठ्यांचा परतीचा प्रवास सुरु
Maratha Andolan Vashi च्या Chhatrapati Shivaji Chowk मध्ये पोहोचलं, अंगावार काटा आणणारा Dron Video

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com