Maratha Andolan Victory: अखेर जरांगे पाटील यांनी आंदोलन घेतलं मागे; उपोषण सोडून CM शिंदेंच्या हस्ते जीआर स्वीकारला

Maratha reservation andolan Victory manoj Jarange Patil News: वाशीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीआरची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
Maratha Victory
Maratha Victory

मुंबई- मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यासंबंधीचा जीआर शासनाने रात्री तयार केला होता. वाशीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीआरची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. (Maratha reservation andolan Victory manoj Jarange Patil withdraws the protest)

मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना नवा जीआर सुपूर्द केला. यामध्ये मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यात मान्य करण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील यांनी हा जीआर स्वीकारत आंदोलन मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे अखेर पाच महिन्यांनतर मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं आहे.

Maratha Victory
Maratha Reservation : मराठा आंदोलनाला मोठं यश! सरकारकडून सर्व मागण्या मान्य, जरांगे लवकरच सोडणार उपोषण

जरांगे पाटील यांना जीआर सुपूर्द करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे वाशीमध्ये आले होते. यावेळी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या पूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी गिरीश महाजन आणि दीपक केसरकर हे मंत्री उपस्थित होते.

सभेआधी मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. जीआर स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना पेढा भरवला. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात विजयाचा गुलाल उधळण्यात आला. जरांगे पाटील यांना यावेळी तलवार देखील भेट देण्यात आली. जरागेंनी मुख्यमंत्री शिंदे यांचे यावेळी अभिनंदन केले.

Maratha Victory
Eknath Shinde: "जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलली शपथ पूर्ण केली"; CM शिंदेंनी केलं मराठा समाजाचं अभिनंदन

गेल्या जवळपास पाच महिन्यापासून सुरु असलेल्या मराठ्यांच्या तीव्र आंदोलनाला आज यश आले आहे अशी भावना जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आता याचा अपमान होऊ नये यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी काळजी घ्यावी, अशी विनंती जरांगेनी केली. आज जरांगे पाटील मराठा बांधवांसोबत मुंबईतून परत निघतील. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com