
मुंबई : मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षण आंदोलनासाठी कार्यकर्त्यांसह मुंबईत आझाद मैदानाकडे निघाले आहेत. मुंबई पोलिसांनी काही अटींसह फक्त एका दिवसाची परवानगी दिली आहे. आझाद मैदानात येणाऱ्या आंदोलकांसाठी मुंबईतील मराठा बांधवांनी पुढाकार घेतला असून, जेवण, वैद्यकीय सेवा आणि वाहन व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे.