#MarathaKrantiMorcha विनोद तावडेंच्या निवासस्थानी रात्री उशीरापर्यंत बैठक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 July 2018

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन कशारितीने हाताळावे याबाबत विचारविमर्श करण्यासाठी काल (ता. 26) रात्री उशीरा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी "सेवासदन"येथे बैठक सुरू होती. 

या बैठकीत मराठा आंदोलनाची कोंडी शांततेच्या मार्गाने कशारितीने फोडली पाहिजे यावर रात्री उशीरा खल सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार संजय कुटे, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात चिघळलेले मराठा मोर्चा आंदोलन कशा रितीने हाताळले पाहिजे. मराठा मोर्चाच्या समन्वयकाशी संवाद कोणी आणि कशा पद्धतीने साधला पाहिजे यावर रात्री उशीरा खल सुरू असल्याचे समजते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha meeting of bjp leaders at vinod tawade s place