esakal | मराठा क्रांती ठोक मोर्चा घेणार मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

maratha kranti thok morcha will take major decision

सरकारने मराठा समाजाला अनेक आश्वासनं दिली होती. या आश्वासनांची पूर्तता अद्याप केलेली नाही. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना सरकारची कोंडी करण्याची रणनीती मराठा क्रांती ठोक मोर्चा आखत आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चा घेणार मोठा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारने मराठा समाजाला अनेक आश्वासनं दिली होती. या आश्वासनांची पूर्तता अद्याप केलेली नाही. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना सरकारची कोंडी करण्याची रणनीती मराठा क्रांती ठोक मोर्चा आखत आहे. येत्या आठवड्याभरात सरकार विरोधात रणशिंग फुंकण्याचा इशारा ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिला.

मराठा आंदोलना दरम्यान मृत पावलेल्यांच्या वारसांना भरघोस आर्थिक मदत मिळावी,मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत,अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातील योजना तात्काळ लागू कराव्यात अन्यथा महामंडळ बरखास्त करावे,मराठा विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत सामावून घेणे, महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात, अश्या प्रमुख मागण्या आहेत.

सरकारने मराठा समाजाला अनेक आश्वासनं दिली मात्र या आश्वासनांची पूर्तता भाजप-शिवसेना सरकारने केली नाही.सरकारमधील मंत्र्यांना मराठा मोर्च्याचे समन्वयक भेटण्याचा प्रयत्न करतात मात्र मंत्री भेटण्यास तयार नाहीत असा आरोप करण्यात आला.अश्या मंत्र्यांना ताळ्यावर आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारची कोंडी करण्यात येईल.येत्या आठवड्याभरात समन्वयकांनी बैठक होणार असून या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी महेश राणे,संदीप डोंगरे,बापूसाहेब शिरसाट,दत्ता मोरे,युवराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी मराठा समाजाला अनेक आश्वासनं दिली होती.या आश्वासनांचा विसर सरकारला पडला आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारला आश्वासनांची आठवण करून  देण्याचा करण्याची निर्णय आम्ही घेतला असून पुढील बैठकीत याबाबतची रणनीती ठरवण्यात येईल.सरकार विरोधात प्रचार करण्याची किंवा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय ही आम्ही घेऊ शकतो.
- महेश राणे, समन्वयक, मराठा क्रांती ठोक मोर्चा

loading image
go to top