

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांचं आंदोलन सुरू आहे. आझाद मैदान परिसरात हजारो मराठा बांधवांनी गर्दी केली असून मुंबईतील वाहतूक ठप्प झालीय. सीएसएमटी परिसरात आंदोलनामुळे चक्का जाम झालाय. तर आता सीएसटीकडून भायखळ्याकडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात आली आहे. जेजे फ्लायओव्हर बंद ठेवण्यात आला आहे.