
मुंबई : मराठा आंदोलकांची सीएसएमटी परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. महानगरपालिकेने आंदोलनकर्त्यांना स्वच्छता वाहने, टँकर आणि रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्वच्छतेसाठी पुरवलेल्या प्लास्टिक बॅगमध्ये कचरा टाकावा आणि प्रसाधनगृहांचा योग्य वापर करून ती स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.