
मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे शुक्रवारी संपूर्ण मुंबई विशेषतः दक्षिण मुंबई ठप्प झाल्याचे चित्र होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडीत अडकण्याची भीतीने फोर्ट, चर्चगेट, गिरगाव, भायखळा परिसरातील गणपतीच्या दर्शनाला जाणे टाळले जात असल्याने भक्तांच्या गर्दीला ओहोटी लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.