
हैद्राबाद गॅझेटिअरच्या अमंलबजावणीचा जीआर हातात घेतल्यानंतर मराठा आंदोलनासाठी सुरु असलेले पाच दिवसांपासूनचे आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी आज सोडले. यानंतर मराठा बांधवांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देणारच हे मी जाहीर सभेत शिवरायांची शपथ घेऊन सांगितले होते.