
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागण्या सरकारने मान्य करून हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर दिला.
दोन दिवसांत कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू होणार असून, जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले.
आंदोलक आणि मराठा समाजाने विजयाचा जल्लोष साजरा केला व हा दिवस "सोन्याचा दिवस" असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर त्यांना सोपविण्यात आला आहे, आता दोन दिवसांत कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात होणार असल्याचे शिष्टमंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले. तसेच त्यांनी मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. यानंतर जरांगेंनी उपोषण सोडायचं काय असे आंदोलकांना विचारले, होकार मिळताच त्यांनी विखे पाटील यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन पाचव्या दिवशी उपोषण सोडले.