Maratha Reservation
Maratha Reservationesakal

Maratha Reservation: सगे सोयऱ्यांचं काय? जरांगेंच्या अटकेबाबतही स्पष्टीकरण, मराठा आरक्षणाच्या बैठकीत काय घडलं?

Maratha Reservation Meeting: ओबीसी समाजाला कुठेही धक्का लागणार नाही, याची खात्री देत देसाई म्हणाले, "मराठा समाजाला आश्वस्त करताना ओबीसी समाजालालाही सांगतो की, त्यांना धक्का लागणार नाही. त्यांचा गैरसमज दूर करण्यात येईल."
Published on

मराठा आरक्षणाबाबत आयोजित नियमित बैठकीत मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीत उपस्थित शंभूराजे देसाई यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, "मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार आढावा घेतला. सगे सोयऱ्यांबाबत ड्राफ्टचा आढावा घेतला आहे. यापूर्वी झालेल्या आढावा बैठकीतील मुद्द्यांवर विधी-न्याय विभाग काम करत आहे."

तेलंगणामधील अधिकाऱ्यांशी संवाद-

तेलंगणामधील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आपले सचिव बोलत असल्याची माहिती देसाई यांनी दिली. हैदराबाद गॅजेटचे सर्टिफाय डॅाक्युमेंटस तपासण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हे मागे घेण्याबाबतच्या प्रकरणांत अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित बाबींवर विधी-न्याय विभाग काम करत आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांना भेट-

मनोज जरांगे पाटील यांना भेटून आल्यावर एक महिन्यातच या कामांना गती देण्यात आली. मला डॉक्टरांनी कळवलं की, त्यांनी रात्री औषध घेतलं आहे. त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे देसाई यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या आश्वासनांवर कायम राहणार असल्याची खात्री देसाई यांनी दिली.

Maratha Reservation
Ajit Pawar: ठाकरे पितापुत्रांसह अजित पवारदेखील जेलमध्ये? सहीसाठी देशमुखांवर आला होता दबाव, खळबळजनक खुलासा

ओबीसी समाजाला आश्वस्त-

ओबीसी समाजाला कुठेही धक्का लागणार नाही, याची खात्री देत देसाई म्हणाले, "मराठा समाजाला आश्वस्त करताना ओबीसी समाजालालाही सांगतो की, त्यांना धक्का लागणार नाही. त्यांचा गैरसमज दूर करण्यात येईल."

अटक आणि गैरसमज-

मनोज जरांगे यांच्या अटकेबाबत गैरसमज असल्याचे दिसते. "मी स्थानिक पातळीवरील पोलिसांकडून माहिती घेतो. त्यांना काही शंका असल्यास आम्ही बोलण्यास तयार आहोत," असे देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी दोन्ही समाजाच्या नेत्यांना संसदीय शब्दांचा वापर करण्याची सूचना देण्यात आली.

Maratha Reservation
Manoj Jarange : "विधानसभेत आपले 40-50 लोक पाहिजेत"; जरांगेंकडून विधानसभेची तयारी सुरु, म्हणाले, आता गेम...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com